Friday 29 May 2015

'ठाणे वनरक्षक'ची मेरीट लिस्ट जाहीर....


महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या आस्थापनेवरील ठाणे विभाग वनरक्षक भरतीची भरती प्रक्रियेनुसार धावण्याची चाचणी नोव्हेंबर २०१४ मध्ये घेण्यात आली होती, हि चाचणी झाल्यानंतरची मेरीट लिस्ट / कट-ऑफ लिस्ट जाहीर झालेली आहे...
तसेच लिस्टमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे....






सौजन्य :- अक्षय डिजिटल, पाथर्डी, जिल्हा – अहमदनगर

Thursday 28 May 2015

सरकारी नोकरभरती बंद !!!

 

रिक्त पदेही गरजेनुसारच भरणार आर्थिक भार कमी करण्यासाठी निर्णय !!

मुळातच खालावलेली आर्थिक स्थिती आणि नजीकच्या काळात येणारा सातवा वेतन आयोग यामुळे आर्थिक घडी पुन्हा एकदा बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन राज्यात नोकरभरतीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबतचा अध्यादेश पुढील आठवडय़ात काढला जाणार आहे. त्याचप्रमाणे अत्यंत गरज असेल तरच रिक्त जागा भरण्यास परवानगी दिली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षांत सातत्याने पडणारा दुष्काळ, महसुली खर्चात झालेली वाढ आणि कर्जाचा ताण यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. राज्यात सत्तेवर येताच आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानुसार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्यात आली. त्यावेळीच राज्याची ढासळती आर्थिक स्थिती सावरण्यासाठी काही ठोस उपाययोजना हाती घेण्याचे सूतोवाच सरकारने केले होते. त्यानुसार नवीन पदांना म्हणजेच नोकरभरतीस काही काळांसाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


भरतीला ओहोटी....

*सध्या उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये बदल करून त्यांच्याकडूनच ही कामे करून घेण्याचानवीन कोणत्याही पदांना मान्यता न देण्याचा आणि भरतीही न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

*शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये म्हणजेच

जिल्हा परिषदमहापालिकानगरपालिकामहामंडळे यांनाही हा निर्णय लागू होणार...

*राज्यात सध्या विविध कार्यालयांमध्ये एक लाख पदे रिक्त आहेत, ती भरण्यावरही टाच आणण्यात आली आहे. अत्यंत गरज असेल तरच अशी पदे मान्यता घेऊन भरावीत, असेही निर्देश देण्यात येणार आहेत.   

पैशाचे न परवडणारे सोंग.....

*सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ७३ हजार कोटीनिवृत्तिवेतनावर २० हजार कोटी तर व्याजावर २७ हजार कोटी असा १ लाख २१ हजार कोटींचा वार्षिक खर्च होतो.

*शिवाय येऊ घातलेल्या सातव्या वेतन आयोगामुळे तिजोरीवर वार्षिक दहा हजार कोटींचा बोजा संभवतो.

नोकर भरतीवर बंदी ???




Tuesday 14 April 2015

पोस्टमन भरती प्रक्रियेस स्थगिती

अंध उमेदवारांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश

लातूर : पोस्ट विभागाकडून पोस्टमन पदासाठी महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यासाठी २९ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्रामध्ये विविध २६ केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षा देण्यास गेलेल्या २५ अंध विद्याथ्र्यांना उस्मानाबाद येथील परिक्षा केंद्रावर त्यांचे लेखणीक हे १० वी पेक्षा जास्त शिक्षीत असल्याच्या कारणावरून पर्यवेक्षक व केंद्र प्रमुखाकडून ऐनवेळी त्यांना परिक्षेस मज्जाव करण्यात आला. त्यामुळे २५ अंध विद्याथ्र्यांना परिक्षेस मुकावे लागले होते. अंध विद्याथ्र्यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेमुळे पोस्टमन भरती प्रक्रियेस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

लातूर येथील विशाल लोहारे व इतर अंध विद्याथ्र्यांनी अ‍ॅड. सतीश चव्हाण व अ‍ॅड. स्वप्नील तावशीकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून त्यांना पुन्हा परिक्षा देण्याची संधी देण्यात यावी अशी विनंती केली आहे. दि. १० एप्रिल २०१५ रोजी सदर याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान याचिका कर्तेयांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, पोस्टमन भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये किंवा नियमावलीमध्ये लेखनीक हा १० वी पेक्षा कमी शिक्षीत असावा असी कुठलीही अट नमुद करण्यात आलेली नव्हती तरी देखील त्यांना ऐनवेळी परिक्षेपासून त्या कारणावरून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे सदर अंध विद्याथ्र्यांवर अन्याय झाला आहे. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायमुर्ती एस.एम. शिंदे व न्यायमुर्ती पी.आर. बोरा यांच्या खंडपिठाने केंद्र शासनास नोटीस बजावण्याचे आदेश दिले. व महाराष्ट्रातील पोस्टमन भरतीच्या प्रक्रियेस पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिलेली आहे.

Tuesday 10 March 2015

नोकऱ्या दीड हजार; अर्ज पाच लाख



पोस्टमनच्या नोकरीसाठी आले अभियंत्यांचे अर्ज 
मुंबई - पोस्टाची सरकारी नोकरी म्हणजे रोजगाराची शाश्‍वत हमी, हे समीकरण राज्यातील तरुणाईने चांगलेच मनावर घेतले आहे. पोस्टमनच्या नोकरीसाठी "बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग‘ केलेल्या तरुणांनीही अर्ज केले आहेत. अवघ्या दीड हजार जागांसाठी राज्यभरातून तब्बल पाच लाख अर्ज आले आहेत. 

पोस्टमन पदासाठी दहावीपर्यंतच शैक्षणिक पात्रता लागते. 18 ते 27 वयोगटातील उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातात. शेवटच्या तारखेपर्यंत अर्जासोबतच्या रकमेचा तपशील दाखल करावयाचा होता. 24 जानेवारीला या पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली होती. महिनाभराच्या प्रक्रियेनंतर पाच लाख अर्ज दाखल झाल्याचे समजते; तर मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदाच्या 725 जागांसाठी दीड लाख अर्ज आले आहेत. मेल गार्डच्या 21 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया होती. एकूण 2 हजार 426 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारी संपली. पोस्टमन आणि मेल गार्ड या दोन्ही पदांसाठी 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये अशी वेतनश्रेणी आहे. भत्त्यापोटी दोन हजार रुपये मिळणार आहेत. 

त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षा

याआधीच्या पोस्टल आणि सॉर्टिंग सहायक या पदांप्रमाणेच या पदांच्या परीक्षाही त्रयस्थ संस्थेमार्फत घेण्यात येणार आहेत. एप्रिलपर्यंत हे उमेदवार नोकरीवर रुजू व्हावेत, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. सध्या टपाल खात्यात 35 टक्के कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

Sunday 8 March 2015

"बार्टी"मध्ये 'समतादूत' पदांच्या भरपूर जागा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या विविध विभागात पथदर्शी प्रकल्पांतर्गत 'समतादूत' म्हणून काम करण्यासाठी भरपूर जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर विभागानुसार जागा :-
पुणे - ७५ जागा
नाशिक - ७५ जागा
नागपूर - ९० जागा
कोकण - ९० जागा
औरंगाबाद - १२० जागा
अमरावती - ७५ जागा

निवड :-
पात्र उमेदवारांची परीक्षा व मुलाखतीच्या माध्यमातून निवड.

मानधन :-
निवड झालेल्या उमेदवारांना रु.१३,०००/- प्रती महिना व प्रवासखर्च.


ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
सोमवार, दि.१६ मार्च २०१५

सविस्तर विभागानुसार जाहिरात :-
पुणे विभाग   -     नाशिक विभाग       -      नागपूर विभाग -
कोकण विभाग -      औरंगाबाद विभाग -        अमरावती विभाग -

विभागानुसार ऑनलाईन अर्ज करा :-
पुणे विभाग   -     नाशिक विभाग       -      नागपूर विभाग -
कोकण विभाग -      औरंगाबाद विभाग -        अमरावती विभाग -

Thursday 5 March 2015

'बेस्ट'मध्ये सुरक्षा रक्षक पदाच्या १६८ जागा


सुरक्षा रक्षक (Security Guard)  -168 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयाची अट : 18 ते 33 वर्षे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 20 मार्च २०१५

Application Form  –